हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
सुरत: राज्याच्या वस्तू आणि सेवा कर विभागाने बोगस जीएसटी बिल दाखवणार्या एक हजार व्यापार्यांना उजेडात आणले आहे. वस्तू आणि सेवा कर विभागाने शनिवारी शहरातील 62 कार्यालये आणि टेक्सटाईल्स, स्क्रॅप, मशिनरीज, ग्रे फ्रॅब्रिक्स अशा दुकानांवर छापा टाकण्यात आला. या व्यापार्यांकडून जवळपास 100 करोडची बोगस बिले दाखवण्यात आली होती. सेवा आणि वस्तू कर विभागाकडून या संदर्भातील कागदपत्रांची छाननी केली जात आहे. एक मोंठा घोटाळा विभागाने उघडकीस आणला असून गुजरातमधील विविध शहरातील अनेक व्यापारी यामध्ये आहेत. तसेच या घोटाळ्यात हात असणार्या राज्याबाहेरील 282 फर्मसही त्यांनी उाडकीस आणल्या आहेत. सूत्रांनी सांगितल्यानुसार, यामध्ये जे व्यापारी नाहीत त्यांनी देखील बोगस जीएसटी नोंद दाखवून बनावट बिले तयार केली, आणि ती कमिशन बेसीसवर व्यापाऱ्यांना विकली. त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. जर एखाद्या व्यापार्याला 5 लाखाचे बनावट बिल बनवून दिले तर त्याला 10 ते 15 टक्के कमिशनपोटी द्यावे लागतात. वस्तू व सेवा कर विभागाचे अधिकारी म्हणाले, आम्ही आतापर्यंत असा किती व्यवहार झाला याच्या शोधात आहोत. अशी अकौंटन्स लवकरच सापडतील, अशी माहिती दिली.