साखर कारखान्यात बायो सीएनजी प्लांटचा कोनशिला समारंभ

बटाला : सहकारी साखर कारखान्यात देशातील पहिल्या बायो सीएनजी प्लांटचा कोनशिला समारंभ झाला. त्याची कोनशिला आमदार अमन शेर सिंह कलसी यांनी बसवली. हा प्लांट नऊ महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. यापासून कारखान्याला एक कोटी रुपये वार्षिक फायदा मिळेल.

जागरणमध्ये प्रकाशीत वृत्तानुसार, आमदार कलसी यांनी सांगितले की, हा देशातील पहिला प्लांट आहे, जो एमईपीएल आणि सीआयआयडी मेरठच्यावतीने बसविण्यात येणार आहे. यामध्ये प्रती दिन १०० टन बायो सीएनजी गॅसचे उत्पादन होईल. यामध्ये गुरुदासपूर, अजनाला, बटाला साखर कारखान्यांच्यावतीने तयार होणारा कचऱ्यापासून सीएनजी गॅस तयार केला जाईल. यापूर्वी साखर कारखान्याला कचरा उठावसाठी स्वतः पैसे खर्च करावे लागत होते. यामध्ये गॅसचा वापर पेट्रोल, डिझेलच्या ऐवजी केला जाईल. आणि यापासून प्रदूषणही कमी होईल. हा प्लांट स्थापन केल्यामुळे युवकांना रोजगार मिळेल आणि सहकारी साखर कारखाना बटाला यास एक कोटी रुपये प्रती वर्ष उत्पन्न मिळेल. यासोबतच कारखान्याची क्षमता वाढविण्यात येत आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा मिळेल. शेतकऱ्यांच्या वेळएची आणि पैशाची बचत होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here