शंकर सहकारी कारखान्याचे साडेचार लाख टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट : आ. रणजितसिंह मोहिते- पाटील

सोलापूर : श्री शंकर सहकारी साखर कारखाना चालू गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसाला पहिला हप्ता प्रती टन २,५०० रुपये देणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दिली. सदाशिवनगर येथील शंकर साखर कारखान्याच्या ५० व्या ऊस गळीत हंगामाचे काटा पूजन, बैलगाडी पुजनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील व आमदार राम सातपुते यांच्या हस्ते काटा पूजन व बैलगाडी पूजन करण्यात आले. गव्हाण व मोळी पूजन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले. सहकार महर्षी व अक्कासाहेब तसेच माजी सहकार राज्यमंत्री स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन नामदेव सावंत व दस्तगीर मुलाणी यांनी केले. संचालक सुरेश मोहिते यांनी सत्यनारायण पूजा केली.

आ. रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले, शंकर सहकारी कारखाना पहिला हप्ता २५०० रुपये देणार आहे. इतर कारखान्यांच्या एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांच्या उसाला दर देणार आहे. हंगामात कारखाना साडेचार लाख मे. टन ऊस गाळप करेल असे उद्दीष्ट आहे. यावेळी ऊस वाहतूक बैलगाडी मुकादम प्रकाश वळकुंडे, शेतकरी सुभाष व अलका शिंडे यांना रोख २५०० रुप्रमाणे पहिला हप्ता देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शिवामृत दूध संघांचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील, सहकार महर्षीचे व्हा. चेअरमन शंकरराव माने-देशमुख, मामासाहेब पांढरे, प्रकाश पाटील, गणपतराव वाघमोडे, मिलींद कुलकर्णी, रावसाहेब मगर, बाजीराव काटकर, दत्तात्रय भिलारे, आप्पासाहेब देशमुख, अनिता लांडगे, भिमराव रेडे-पाटील, सत्यप्रभादेवी मोहिते पाटील, वैष्णवीदेवी मोहिते पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here