अजमेर : मदनगंज पोलीस ठाण्यांतर्गत गेल्या काही दिवसात साखर व्यापारी पवन राठी यांच्याकडे झालेल्या चोरीचा तपास लवकरच लागेल अशी चिन्हे आहेत. मदनगंज ठाण्यातील पोलीसांनी या चोरीशी संबंधित असलेल्या ४ लोकांना अटक केली आहे. या प्रकरणात स्थानिकांचे सहकार्य असल्याचा अंदाज पोलीसांनी वर्तवला आहे. किशनगढ येथील बृजविहार कॉलनीतील जोन्स स्कूल समोर राहणारे मनीष माली आणि ईश्वर जोगी या चोरीचे सूत्रधार असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे. या आरोपींना पोलीसांनी जाफराबाद परिसरातून ताब्यात घेतले आहे, अजून ६ आरोपी फरार आहेत. यांच्या जवळ चोरीचा कुठलाही पैसा मिळालेला नाही.
किशन गढ येथील मदन गंज ठाण्याचे ठाणाधिकारी रोशनलाल यांनी सांगितले की, या चोरी प्ररकरणात अजमेर च्या डिग्गी गल्लीत राहणारा उस्मान (२०), नॉर्थ ईस्ट दिल्ली निवासी असिफ उर्फ मोईन खान (२५), दिल्लीतील जाफराबाद येथील फरमान उर्फ नन्हें (२०) आणि भील वाडा येथील प्रतापनगर ठाणा निवासी साबित यांना ताब्यात घेतले आहे. चोरीसाठी सर्वानी बाईक चा वापर केला होता.
या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलीसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. दिल्लीचा जाफराबाद परिसर अतिशय संवेदनशील आहे आणि इथले लोक गुन्हेेगारी प्रवृत्तीचे आहेत, त्यामुळे इथून आरोपींना ताब्यात घेणे पोलीसांना कठीण गेले.
सणाासुदीमुळे साखर व्यापारी पवन राठी यांच्या घरात रोख रक्कम अधिक होती. याचा फायदा चोरांनी घेतला. व्यापाऱ्याने चोरीची रक्कम 12 लाख रुपयाची असल्याचे सांगितले होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.