काशीपूर : ऊस हंगाम हळूहळू समाप्तीच्या दिशेने जात आहे. राज्यातील सात साखर कारखान्यांपैकी चार कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले आहे. तर तीन कारखाने अद्याप शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करत आहेत. कारखान्यांनी आतापर्यंतच्या एकूण ११८८ कोटी रुपयांपैकी ६३१ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. तर ५५७ कोटी रुपये अद्याप कारखान्यांकडे थकीत आहेत.
यंदाचा, २०२०-२१ या वर्षातील ऊस हंगाम अंतिम टप्प्यावर आला आहे. आतापर्यंत बाजपूर साखर कारखान्याने ३४.४३ लाख क्विंटल, नादेही कारखान्याने २५.६३ लाख क्विंटल, किच्छा कारखान्याने ३९.३२, डोईवालाने २६.०२, लिब्बरहेडीने ७२.७१, इकवालपूरने ४९.८९ आणि लक्सर कारखान्याने १२१.०७ लाख क्विंटल ऊस शेतकऱ्यांकडून खरेदी केला आहे.
ऑक्टोबर २०२० पासून सुरू झालेल्या गाळप हंगामात राज्यातील सात कारखान्यांनी एकूण ३६८.९८ लाख क्विंटल ऊस खरेदी केला आहे. उत्तराखंड काशीपूर ऊस तथा साखर आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, सात कारखान्यांनी एकूण ११८८.९० कोटी रुपयांचा ऊस खरेदी केला आहे. त्यापैकी ६३१.३७ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. तर ५५७.५३ कोटी रुपये कारखानदारांकडे थकीत आहेत.
बाजपूर, नादेही, डोईवाला आणि इकबालपूर हे चार कारखाने बंद झाले आहेत. तर किच्छा, लिब्बरहेडी आणि लक्सर हे कारखाने अद्याप सुरू आहेत. राज्यातील सात कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून ११८८.९० कोटी रुपयांचा ऊस खरेदी केला आहे. त्यापैकी ६३१.३७ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. तर ५५७.५३ कोटी रुपये थकीत आहेत. पैसे देण्याची प्रक्रिया गतिमान आहे असे उत्तराखंडचे ऊस आयुक्त ललित मोहन रयाल यांनी सांगितले.