कोल्हापुरात चार साखर कारखान्यांकडून ऊसाला विनाकपात 3100 रुपये दर देण्याची घोषणा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांकडून विनाकपात 3100 रुपये दर देण्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षीच्या ऊस हंगामातील चारशे रुपये दिल्याशिवाय चालू हंगामात ऊसाच्या कांडाला हात लावू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी कह्स्दर राजू शेट्टी यानि सुरु केलेल्या जनआक्रोश यात्रेला कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत जागोजागी ऊसतोडी बंद पडल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर करून कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे चारही साखर कारखाने हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील आहेत, जेथे मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु आहे.

ज्या चार कारखान्यांनी विनाकपात 3100 रुपये दर देण्याची घोषणा केली आहे, त्यामध्ये  गुरुदत्त, जवाहर, दत्त आणि शरद साखर कारखान्यांचा समावेश आहे. या चार साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांचे पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. दरम्यान, साखर हंगाम समाप्तीनंतर रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युल्यानुसार निघणारा अंतिम दर साखर आयुक्तांच्या मान्यतेने देणार असल्याचे यामध्ये म्हटले आहे.

राजू शेट्टी यांनी ‘आरएसएफ’ फॉर्मुला हा साखर कारखानदार आपल्या मनमानी पद्धतीने वापरत असल्याचा आरोपी जनआक्रोश यात्रेमधून केला आहे.   दरम्यान, साखर कारखान्यांनी जर उपपदार्थातील हिस्सा शेतकऱ्यांना देणार नसेल तर इथेनॅाल निर्मीतीला आमचा विरोध असून कारखान्यांनी साखरचेच उत्पादन घ्यावे, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. 400 रूपयांच्या दुसऱ्या हप्त्यासाठी काढण्यात आलेली आक्रोश पदयात्रेचा आठवा मुक्काम कोडोलीत झाला.

यावेळी शेट्टी म्हणाले की, राज्यातील साखर कारखाने इथेनॅालसह वीज निर्मीती व उपपदार्थ निर्मीती मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. यामधून साखर कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवले आहे. मात्र, कारखानदार त्या उत्पन्नातील राहिलेल्या नफ्याचे पैसे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यास तयार नाहीत. रंगराजन समितीच्या शिफारशीतील कारण पुढे करून उपपदार्थातील वाटा शेतक-यांना देण्यास टाळाटाळ करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here