फ्रान्सचे Bernard Arnault बनले जगातील पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत

जगातील टॉप १० अब्जाधिशांच्या यादीत मोठा फेरबदल दिसून आला आहे. Elon Musk आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिलेले नाहीत. फ्रान्सचे दिग्गज व्यावसायिक बर्नार्ड अर्नाल्ट यांनी श्रीमंतीमध्ये त्यांना मागे टाकले आहे. अर्नाल्ट हे १८६.५ अब्ज डॉलरच्या नेटवर्थसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सच्या रिअल टाइम बिलेनिअर्स इंडेक्सनुसार, दीर्घ काळापासून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एलन मस्क यांच्या संपत्तीत घसरण झाल्यानंतर ते द्वितीय क्रमांकावर आले आहेत. एलन मस्क यांचे नेटवर्थ १८१.३ अब्ज डॉलर झाले आहे. मस्क आणि अर्नाल्ट यांच्यादरम्यान फारसे अंतर नाही. दोघांच्या संपत्तीत ५.२ अब्ज डॉलरची कमतरता आहे.

आज तकमधील वृत्तानुसार इलेक्ट्रिक कार उत्पादक सर्वात मोठी कंपनी टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी २०२१ मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याचा मान पटकावला होता. त्यांनी अमॅझोनचे जेफ बेजॉस यांना पाठीमागे टाकून हे स्थान पटकावले होते. तेव्हा मस्क यांची संपत्ती १८८ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली होती. तर बेजॉस यांची संपत्ती १८७ अब्ज डॉलरवर मर्यादीत राहिली होती. सध्या बेजॉस यांची संपत्ती ११३.८ अब्ज डॉलर आहे. ते चौथ्या क्रमांकावर आहेत. भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांनी त्यांना मागे टाकले आहे. अदानी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या टॉप १० च्या यादीत भारतातील दोन उद्योगपती आहेत. गौतम अदानी १३४.६ अब्ज डॉलरसह जगभरातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी ९२.८ अब्ज डॉलरसह आठव्या क्रमांकावर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here