जळगाव : ऊसतोड कामगार पुरवतो, असे म्हणून रावणगाव येथील एका ट्रॅक्टर मालकाची सुमारे साडेसात लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत ट्रॅक्टर मालक गबाजी राजाराम गाढवे (रा. रावणगाव, ता. दौड) यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी याप्रकरणी संशयित विठोबा उत्तम सोनवणे (रा. गंगापुरी, ता. धरणगाव, जि. जळगाव) याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या हंगामात संशयित विठोबा सोनवणे हा रावणगाव येथे कारखान्याला ऊस तोडण्यासाठी आला होता. त्याने पुढील वर्षात गळीत हंगामासाठी मजूर पुरवितो, असे गबाजी गाढवे यांना सांगितले. मार्च २०२३ मध्ये सोनवणे याने फोन करून ऊस तोडणी कामगारांची टोळी हवी असेल तर कामगारांना देण्यासाठी ७ लाख ५० हजार रुपये द्या असे सांगितले. यावेळी गाढवे यांनी ऑनलाइन पैसे पाठवले. मात्र, संशयित सोनवणे याने आजपर्यंत ऊस तोडणी मजूर पुरवले नाहीत. या प्रकरणी पोलिस हवालदार बापू बंडगर तपास करीत आहेत.