नवी दिल्ली : मुक्त व्यापार करारासाठी भारत आणि ब्रिटन या दोन्ही देशांदरम्यान दीर्घकाळ चर्चा सुरू आहे. ही चर्चा लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. दोन्ही देशांकडून विविध पातळ्यांवर मुक्त व्यापार कराराबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. याआधी दोन्ही देशांमधील मुक्त व्यापार करार संदर्भात कराराची अंतिम मुदत दिवाळीपर्यंत ठेवण्यात आली होती, मात्र, ब्रिटनमध्ये निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगामुळे हा करार पूर्ण होऊ शकला नाही. आता लवकरात लवकर या चर्चेला अंतिम रुप देऊन करार पूर्ण केला जाऊ शकतो असे सूत्रांनी सांगितले.
याबाबत, एबीपी लाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार, दोन्ही देशांमधील मुक्त व्यापार करार मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. जानेवारी महिन्यात दोन्ही देशांनी एफटीएसाठी बोलणी सुरू केली. करार ऑक्टोबरपर्यंत पूर्ण व्हावा अशी अपेक्षा होती. मात्र तसे घडलेले नाही. दोन्ही देशांना करार लवकरात लवकर पूर्ण करायचा आहे.