मउ : पुढच्या गाळप हंगामात शेतकर्यांना केवळ एसएमएस वरुन ऊस पावती मिळेल. कागदाची पावती देण्यावर आता प्रतिबंध घातला आहे. जिल्हा ऊस अधिकार्यांनी शेतकर्यांना आग्रह केंला की, त्यांनी आपल्या मोबाईल नंबरची नोंदणी ऊस समितीमध्ये करावी.
जिल्हा ऊस अधिकारी सुनील कुमार सिंह यांनी सांगितले की, कोविड 19 ची महामारी आणि पर्यावरणीय हानीपासून वाचण्यासाठी ऊस विभागाकडून आगामी गाळप हंगामामध्ये केवळ एसएमएस वरुनच पावती दिली जाईल. शेतकर्यांनी विभागाला जो मोबाइल नंबर दिला आहे, त्यामध्ये जर बदल झाला तर शेतकर्यांनी पुन्हा आपला नंबर ऊस समितीमध्ये नोंद करावा. ही नोंदणी शेतकरी स्वयं ईआरपी पोर्टल वरुन किंवा ऊस अॅप वर दिलेल्या ऑप्शन वरुनही करु शकतात. सध्या ग्रामवार केल्या जाणार्या ऊस सर्वेक्षणाचे डिस्प्ले आणि प्रदर्शन कार्यक्रमा दरम्यान संबंधित ऊस पर्यवेक्षक किंवा साखर कारखाना घोसी यांना नोट करु शकतात. त्यांनी सांगितले की, जे शेतकरी आतापर्यंत ऊस समिती चे सदस्य नाहीत किंवा नवी सदस्य बनू इच्छित आहेत त्यांनी अनिवार्यपणे 30 सप्टेंबर 2020 पर्यंत ऊस पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना ऊस पुरवठ्याची सुविधा प्रदान केली जाणार नाही.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.