जादा ऊस दरामध्ये एफआरपी कायद्याचा अडथळा : रघुनाथदादा पाटील

सांगली : ऊस आणि ताग उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी एसएमपी आणली गेली. हा कायदा रद्द करण्यासाठी शेतकरी संघटनेत फूट पाडली गेली. राजू शेट्टी यांना हाताशी धरत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची निर्मिती करून एफआरपीचा कायदा आणण्यात आला. या कायद्यामुळेच शेतकऱ्यांना तीन हजारापेक्षा अधिक दर मिळत नाही. याला शरद पवार आणि राजू शेट्टी हेच जबाबदार आहेत, असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केला. एसएमपी कायदा रद्द करण्यात आला आणि एफआरपी आणली. एफआरपी आल्याने दरवाढ आपोआप खुंटली आहे असे ते म्हणाले.

पत्रकार परिषदेत रघुनाथदादा पाटील म्हणाले की, कारखानदारधार्जिण्या नेत्यांनी शेतकरी संघटनेमध्ये फूट शेट्टी यांना मोठे केले. शेट्टी कारखानदारांचे बगलबच्चे म्हणून काम करत आहेत. त्यांनी कारखानदारांच्या हिताचेच निर्णय घेतले. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शरद पवार, विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे हे कारखानदार नेते शेट्टी यांच्या पाठीशी उभे राहिल्याने ते आमदार, खासदार झाले. जर ५० वर्षात प्रत्येक दहा वर्षाला उसाचा दर दुप्पट होत होता, तर मग गेल्या दहा वर्षात तो का झाला नाही? असा सवाल पाटील यांनी केला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here