हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
कोल्हापूर, ता. 10 : कृषीमालाला हमीभाव मिळावा, शेतकऱ्यांच्या घामाला चांगला दाम मिळावा असा प्रचार करत लोकसभेसाठी सर्वच पक्ष आणि अपक्ष उमेदवारांकडून मते मागितली जात आहेत. निवडणुकीच्या धामधुमित शेतकऱ्यांना यावर्षीच्या गळीत हंगामातील एफआरपीची संपूर्ण रक्कम मिळालेली नाही. तसेच, कारखाना संपण्याआधी गाळप झालेल्या उसाची पूर्ण एफआरपी मिळाली आहे, याकडे मात्र कोणीही लक्ष दिलेले नाही. त्यामुळे, शेतकऱ्यांचे हित केवळ निवडणूकीच्या प्रचारातच दिसत आहे.
देशात आणि विशेषता महाराष्ट्रात तरी शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून प्रचार केला जात आहे. या केंद्रबिंदु भोवती फिरणारा ऊस आणि साखर दराकडे कोणीही लक्ष देत नाही, असे चित्र पाहायला मिळत आहे. देशात 307 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाले आहे. महाराष्ट्रामध्ये 120 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाले आहे. यापैकी 50 ते 60 टक्के साखर शिल्लक असल्याचे कारखान्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे एफआरपीची रक्कम पूर्णपणे दिलेली नाही. दरम्यान, निवडणूकी आधी ज्या साखर आणि ऊसाबद्दल जाहीररित्या नेत्यांवर आरोप करत होते. ते सर्वच नेते आता आपआपल्या प्रचाराच्या कामात असल्याने शेतकऱ्यांच्या या महत्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp