कोल्हापूर, दि. 2 जुलै 2018 : केंद्र सरकार एस आर पी च्या धोरणात बदल करत आहेत. हा बदल शेतकऱ्यांना परवडण्यासारखा नाही. एफ आर पी ठरविताना पूर्वी 9.5 रिकव्हरी चा बेस ठरवला जात होता आता मात्र 10 हा बेस पकडला जाणार आहे. त्यामुळे यावर्षीच्या पार्टीमध्ये 55 रुपयांचा फटका बसणार आहे. सरकार घेत असलेल्या या निर्णयाविरुद्ध जन आंदोलन करण्याच्या तयारीत शेतकरी व संघटना आहेत.
ऊस गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी साखर विक्रीचा बाजारातील दर पाहून एफ आर पी ठरवली जाते. हा दर ठरवताना 9.5 टक्के रिकव्हरीला ठराविक रक्कम दिली जाते. त्यानंतर त्यावरील 1 टक्के रिकव्हरीसाठी ठराविक रक्कम दिली जाते अशा पद्धतीने या एफ आर पी ची रक्कम निर्धारित केली जात आहे. यावर्षीच्या 9.5 टक्के उताऱ्यासाठी 2 हजार 750 व त्यापुढील प्रत्येक टक्क्यासाठी 289 रुपये एफआरपी दिली जाणार आहे. मात्र ही एफआरपी जास्त होत असल्याचे कारण पुढे करत यावर्षीपासून 9.5 ऐवजी 10 टक्के रिकव्हरी चा बेस पकडला जाणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे अर्धा टक्के रिकव्हरी कमी केल्यामुळे शेतकऱ्यांना 55 रुपयांचा तोटा होणार आहे त्यामुळे दहा टक्के रिकव्हरीला 2 हजार 7 50 आणि त्यावरील प्रत्येक टक्के ला 145 रुपये मिळण्याचे संकेत आहेत याचा सर्वच थरातून निषेध केला जाणार आहे. शेतकरी आणि विविध संघटनांनी सरकारच्या या धोरणाला विरोध करण्यासाठी आत्तापासूनच मोट बांधली आहे. सरकार घेत असलेल्या या निर्णयाला सडेतोड उत्तर देण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरण्याची भाषा बोलत आहेत.