कोल्हापूर : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याकडे गाळपासाठी आलेल्या उसाला टनाला ३,१५० रुपयांप्रमाणे एफआरपी आदा केली आहे. आतापर्यंत आलेल्या व यापुढे येणाऱ्या सर्वच उसाला टनाला ३,२५० रुपयांप्रमाणे एफआरपी दिली जाणार आहे, अशी घोषणा अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी दिली. कारखान्याने आजअखेर सिरपपासून ११ लाख लीटर्स इथेनॉल निर्मिती केली आहे. तर चार लाख लीटर इथेनॉलची निर्यात पूर्ण झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले की, कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. आता या प्रकल्पात दररोज सीरपपासून एक लाख लिटर उत्पादन केले जात आहे. हंगामात ऑईल कंपन्यांकडून ८० लाख लीटर्स सिरप आणि ६० लाख लीटर्स बी हेवीपासून, असे एकूण १ कोटी ४० लाख लीटर्स इथेनॉल पुरवठा करण्याचे करार झाले आहेत. त्यादृष्टीने गतीने उत्पादन सुरू आहे. कारखान्याने यापूर्वी दिलेल्या ऊस दरापेक्षा जादा १०० रुपये प्रती टन दर दिला जात आहे.