सलग दुसऱ्या दिवशी इंधन दरवाढ : दिल्लीत ८० पैसे तर मुंबईत ८५ पैशांची वाढ

नवी दिल्ली : देशातील सर्वसाान्य नागरिकांना सलग दुसऱ्या दिवशी महागाईचा झटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज दुसऱ्या दिवशीही वाढ झाली. बुधवारी सकाळी पेट्रोल, डिझेलचे दर ८० ते ८५ पैशांनी वाढले. दिल्लीत एक लिटर पेट्रोल ९७.०१ रुपये प्रती लिटर तर डिझेल ८८.२७ रुपये प्रती लिटर झाले. मुंबईत पेट्रोल १११.६७ रुपये आणि डिझेल ९५.८५ रुपये प्रती लिटर झाले आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर १०६.३४ आणि डिझेल ९१.४२ रुपये प्रती लिटर झाले आहे. तर चेन्नईतही पेट्रोल १०२.९१ आणि डिझेल ९२.९५ रुपये प्रती लिटर झाले आहे. गेल्या वर्षी, ४ नोव्हेंबरनंतर दोन्ही इंधन दरात कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती.

केंद्र सरकारने पाच राज्यांतील निवडणुकांमुळे तेल कंपन्यांना दरवाढ करण्यास रोखल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर ११२ डॉलर प्रती बॅरलवर पोहोचल्यानंतर रविवारी तेल कंपन्यांनी डिझेलच्या घाऊक खरेदी दरात २५ रुपये प्रती लिटरची वाढ केली होती. किरकोळ दरात हळूहळू वाढ करण्यात येणार असल्याचे इंधन वितरकांचे म्हणणे आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लखाडमध्ये पेट्रोल १०० रुपये प्रती लिटरवर मिळत आहे. मुंबईत पेट्रोलचा दर सर्वाधिक आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलतात. सकाळी सहा वाजता ते अपडेट केले जातात. पेट्रोल डिझेलचे नवे दर तुम्ही SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP यासोबत आपल्या शहराचा कोड नंबर लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस करू शकतात. BPCLचे ग्राहक RSP लिहून ९२२३११२२२२ या क्रमांकावर मेसेज करून माहिती मिळवू शकतात. तर HPCL चे ग्राहक HPPrice लिहून ९२२२२०११२२ या क्रमांकावर मेसेज पाठवून दर जाणून घेऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here