बीड : हजारो शेतकरी आणि सर्वसामान्य सभासदांच्या पाठबळामुळे गेल्या वर्षीपासून गजानन साखर कारखाना सुरू झाला आहे. याचा फायदा हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. आगामी हंगामातही सर्व शेतकरी सभासदांच्या उसाचे वेळेत गाळप करण्यासाठी कारखाना प्रशासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले. आ. क्षीरसागर यांच्या हस्ते गजानन सहकारी साखर कारखान्याच्या २०२३-२४ हंगामासाठी मिल रोलर पूजन करण्यात आले.
शुक्रवार (दि.८) रोजी सोनाजीनगर, राजुरी नवगण (ता.बीड) येथील डि.व्ही.पी. कमोडिटी प्रा.लि. संचलित गजानन साखर कारखाना गळीत हंगाम २०२३-२४ चा मिल रोलर पूजन कार्यक्रम झाला. यावेळी आ. संदीप क्षीरसागर यांच्यासह महंत अमृतदास महाराज जोशी, अमरजी पाटील, मदन जाधव वैजीनाथ नाना तांदळे, भारत झांबरे पाटील, डॉ.बाबुराव जोगदंड, अर्जुन क्षीरसागर, अशफाक इनामदार, सुहास शिंदे, बाळासाहेब बहीर, लिमकर आदी उपस्थित होते.