महाराष्ट्रातील गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरु होणार ?, उद्या होणार शिक्कामोर्तब

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बुधवारी 18 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीत मंत्री समिती 2023-2024 चा गाळप हंगाम सुरू करण्याबाबत तारीख निश्चित करणार आहेत. मंत्री समितीच्या बैठकीतील निर्णयाकडे राज्याच्या साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे. वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या होणाऱ्या बैठकीत राज्य सरकार 1 नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरु करण्यावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे. साधारणपणे दरवर्षी 15 ऑक्‍टोबरपासून साखरेचा गळीत हंगाम सुरू होतो, मात्र यंदा पाऊस नसल्याने पिकाच्या वाढीवर झालेल्या परिणामामुळे गळीत हंगाम १५ दिवसांनी लांबणीवर पडला आहे.उद्योग तज्ज्ञांच्या मते, मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील समिती 1 नोव्हेंबर 2023 पासून कारखान्यांना गाळप सुरू करण्याची परवानगी देणे अपेक्षित आहे.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघठनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी मांगील वर्षी गाळप झालेला उसाला प्रति टन अतिरिक्त 400 रुपये दर द्यावा, या मागणीसाठी आजपासून (17 ऑक्टोबर) शिरोळ येथून जनआक्रोश यात्रेला सुरुवात केली आहे. शेट्टी यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय माघार नाही, अशी भूमिका घेतल्याने मंत्री समितीच्या बैठकीत या जनआक्रोश यात्रेचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. राज्य सरकार स्वभिमानीच्या आंदोलनावर नेमकी काय भूमिका घेणार ? याकडे राज्यातील लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here