गणेश सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला प्रारंभ

राहाता : गणेश सहकारी साखर कारखाना चालवताना येणाऱ्या अनेक अडचणींवर मात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा कारखाा चालावा यासाठी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व मी प्रयत्नशील आहोत. तीन ते चार लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले, तर कारखान्याचे अर्थचक्र व्यवस्थित चालते. निळवंडे धरणाच्या पाण्यामुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उसाची लागवड वाढेल. मात्र, तोपर्यंत शेजारील कारखान्यांनी येथील ऊस नेऊ नये, अशी अपेक्षा कारखान्याचे मार्गदर्शक व कोपरगावच्या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली. गणेश कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.

महंत रामगिरी महाराज व साकुरी येथील सदगुरु उपासनी संस्थानच्या कन्यावृदांच्या हस्ते गळीत हंगामा प्रारंभ झाला. कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते, कार्यकारी संचालक नितीन भोसले, गंगाधर चौधरी, शिवाजी लहारे, उद्योजक दिलीप रोहोम, डॉ. एकनाथ गोंदकर, रामचंद्र बोठे आदी उपस्थित होते. महंत रामगिरी महाराज म्हणाले की, गणेश कारखाना हा परिसराची कामधेनू आहे. हे लक्षात घेऊन सर्वांनी सहकार्य करावे. आमदार बाळासाहेब थोरात व युवानेते विवेक कोल्हे यांनी अनेक अडचणींना तोंड देत गणेश कारखाना चांगला चालविला आहे. यावेळी चंद्रभान धनवटे, दीपक चोळके, उत्तमराव मते, उत्तमराव घोरपडे, गणपतराव धरम, बलराज धनवटे, सुरेश गमे, भिकाजी घोरपडे, डॉ. वसंत लभडे, विक्रम वाघ, रमेश गागरे, सखाराम चौधरी आदी उपस्थित होते. कार्यकारी संचालक नितीन भोसले यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष विजय दंडवते यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here