गौतम अदानींचा पुन्हा नवा विक्रम, बनले जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती

नवी दिल्ली : गौतम अदानी (Gautam Adani) हे भारतासह आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. गेल्या काही वर्षांपूर्वी जगभरातील फारसे लोक त्यांना ओळखत नव्हते. मात्र, आता अदानी यांच्या नेटवर्थने उच्चांक प्रस्थापित केला आहे. ब्लुमबर्गच्या इंडेक्सनुसार गौतम अदानी जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. अदानी असे करणारे आशियातील पहिले व्यक्ती आहेत. ब्लुमबर्ग इंडेक्सनुसार अदानी यांनी आता Louis Vuitton चे सीईओ तथा चेअरमन बर्नार्ड अर्नाल्ट यांना मागे टाकले आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, अदानी यांचे नेटवर्थ वाढून १३७.४ बिलियन डॉलर झाली आहे. आता अदानी यांच्या पुढे टेस्लाचे सीईओ एलन मस्क आणि अमेझॉनचे फाउंडर जेफ बेजोस आहेत. मस्क यांचे नेटवर्थ २५१ बिलियन डॉलर आहे. तर बेझोस यांची संपत्ती १५३ बिलियन डॉलर आहे. गल्या काही वर्षात अदानी यांचे नेटवर्थ गतीने वाढले आहे. जगभरातील शेअर बाजारात विक्रीचा ट्रेंड वाढत असताना अदानी यांची दौलत सातत्याने वाढत आहे. ब्लुमबर्ग इंडेक्सच्या माहितीनुसार, अदानी जगातील टॉप १० श्रीमंतांच्या यादीतील एकमेव असे व्यक्ती आहे, ज्यांची संपत्ती गेल्या २४ तासात वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here