श्रीमंतांच्या टॉप २० यादीतून गौतम अदानी पुन्हा एकदा बाहेर

भारतातील दिग्गज व्यावसायिक आणि अदानी ग्रुपचे मालक गौतम अदानी पुन्हा एकदा जगातील टॉप २० श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत. फोर्ब्स रिअल टाइम बिलिनिअर्स लिस्टनुसार, शुक्रवारी गौतम अदानी टॉप २० यादीतून बाहेर घसरले. त्यांच्या नेटवर्थमध्ये एकूण ५.७ बिलियन डॉलरची घसरण नोंदविण्यात आली. अदानींच्या शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदविण्यात आली आहे. अदानी समुहाचे सर्व शेअर्स घसरणीने ट्रेड करताना दिसून आले होते. फोर्ब्सच्या रिअल टाइम बिलिनिअर्स लिस्टनुसार अदानी श्रीमंतांच्या यादीत २१ व्या स्थानी आहेत. त्यांचे एकूण नेटवर्थ ५९.३ बिलियन डॉलर्सचे राहिले आहे.

एबीपी लाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार, Louis Vuitton चे सीईओ आणि मालक बर्नार्ड अरनॉल्ट हे जगातील पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांचे एकूण नेटवर्थ २१३.५ बिलियन डॉलर आहे. दुसऱ्या क्रमांकावर टेस्लाचे आणि ट्विटरचे मालक एलन मस्क आहेत. त्यंचे नेटवर्थ १९५.३ बिलियन डॉलरचे आहे. तिसऱ्या क्रमांकावर अमेझॉनचे जेफ बेजोस आहेत. त्यांचे नेटवर्थ १२१.४ बिलियन डॉलरचे आहे. शुक्रवारी शेअर मार्केट सुरू होताच १० टक्क्यांची घसरण अदानी एंटरप्रायजेसच्या शेअर्समध्ये दिसून आली. अदानी पॉवर, अदानी विल्मर, अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅसच्या शेअर्समध्ये ५-५ टक्क्यांची घसरण होती. अदानी एंटरप्रायजेसला १० टक्के घसरणीसह लोअर सर्किट लागले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here