घसरणीनंतर गौतम अदानींची नवी झेप, श्रीमंतांच्या यादीत मिळवला ३० वा क्रमांक

गेल्या एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून अब्जाधीशांच्या यादीतून रोज घसरण होत असलेले उद्योगपती गौतम अदानी यांना अखेर दिलासा मिळाला आहे. मंगळवार आणि बुधवारी अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली. त्यामुळे त्यांच्या संपत्तीत सुधारणा झाली. गेल्या २४ तासात त्यांचे नेटवर्थ २.१९ अब्ज डॉलरने वाढले आहे. आता अब्जाधिशांच्या यादीत ते चार अंक वर येवून ३० व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. अमेरिकन रिसर्च फर्म हिंडनबर्गचा अहवाल २४ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध झाला होता. तेव्हापासूनच अदानी यांच्या साम्राज्याला हादरे बसले होते.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या महिन्यात त्यांचे नेटवर्थ ८० अब्ज डॉलरपेक्षा कमी झाले आहे. मंगळवारी, २८ फेब्रुवारी रोजी त्यांच्या शेअर्सनी गती घेतली. बुधवारीही हा वेग कायम राहिला. त्यामुळे ३४ व्या क्रमांकावर पोहोचलेल्या अदानी यांच्या नेटवर्थने उसळी घेतली. याबाबत Bloomberg Billionaires Index नुसार, अदानी यांची संपत्ती आता ३९.९ अब्ज डॉलर झाली आहे. हिंडनबर्गुळे अदानी यांना दररोज ३ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. शेअर्समधील घसरणीमुळे अदानी ग्रुपचे मार्केट कॅपिटल घसरुन १०० अब्ज डॉलरपेक्षा कमी झाले. यामुळे गुंतवणूकदारांवरही नकारात्मक परिणाम झाला. त्यामुळे डीबी पॉवर, पीटीसी इंडिया आणि ओरियंट सिमेंट या डील सुद्धा त्यांना गमवाव्या लागल्या आहेत. अदानी यांना या काळात २०,००० कोटी रुपयांचा आपला एफपीओ (फॉलो ऑफ पब्लिक ऑफर) मागे घ्यावा लागला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here