कोल्हापूर : कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या ३१ व्या ऊस गळीत हंगामासाठी काटा पूजन व गव्हाण पूजन समारंभ उत्साहात झाला. संस्थापक-चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते मोळी पूजन करून हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. केन कमिटीचे चेअरमन राहुल आवाडे आणि व्हा. चेअरमन बाबासो चौगुले यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. ज्येष्ठ संचालक आमदार प्रकाश आवाडे व किशोरी आवाडे या उपस्थित होत्या.
संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे म्हणाले की, यंदाच्या हंगामासाठी २१,७०० हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झाली आहे. १ नोव्हेंबरपासून कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होत आहे. यासाठी आवश्यक यंत्रसामग्री व तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज आहे. हंगाम यशस्वीपणे करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी चेअरमन उत्तम आवाडे, स्वप्नील आवाडे, जे. जे. पाटील, जयपाल उगारे, धनंजय मगदूम, रावसाहेब मुरचिटे, संचालक आण्णास गोटखिंडे, आदगोंडा पाटील, सुकुमार किणिंगे, अभयकुमार काश्मिरे, दादासो सांगावे, सूरज बेडगे, शीतल आमण्णावर, संजयकुमार कोथळी, गौतम इंगळे, सुमेरु पाटील, जिनगोंडा पाटील, कमल पाटील, वंदना कुंभोजे, कार्यकारी संचालक मनोहर जोशी आदी उपस्थित होते.