रुद्रपूर : उसाचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर साखर कारखान्यांमध्ये ब्रेक डाऊनची समस्या अनेकदा उद्भवते. जर यावेळी अशा प्रकारे गळीत हंगामात कारखाना ब्रेक डाऊन झाल्याचा प्रकार घडल्यास यासाठी सरव्यवस्थापक आणि मुख्य अभियंत्यांना जबाबदार धरले जाईल. त्यांचे वेतन रोखण्यासह वेतन कपातीची कारवाई केली जाईल, असा इशारा कॅबिनेट मंत्री सौरभ बहुगुणा यांनी दिला. पिथौरागडमध्ये ऊस तोडणी यंत्रणा लवकरात लवकर आणावी अशी सूचना मंत्र्यांनी यावेळी दिल्या.
जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, विकास भवन सभागृहातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संवादावेळी जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखान्यांचे कर्मचारी, सरव्यवस्थापकांनी आपल्या समस्या मांडल्या. शेतकऱ्यांनी ऊस विकास मंत्री सौरभ बहुगुणा यांना ऊस बिल देण्यास गती द्यावी, कारखान्यांची जुनी मशीनरी बदलावी, वेळेवर मशीन तपासणी करावी, प्रती क्विंटल तीन किलो कपात रद्द करावी, नवे वजनकाटे लावावेत आदी मागण्या केल्या. त्यानंतर मंत्री बहुगुणा यांनी अधिकाऱ्यांनी एसीमध्ये बसून योजना बनवू नयेत, लोकांशी संवाद साधावा असे सांगितले. पिथौरागडमध्ये लौकरच मशीन आणले जाईल असे सांगितले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविल्या जातील. सध्या १४० कोटी रुपयांची थकीत बिले दिली आहेत. दोन महिन्यांत ५०५ कोटी रुपयांची बिले दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सीतरागंज कारखाना २५ लाख क्विंटल उसाचे गाळप करील असे ते म्हणाले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष विवेक सक्सेना, अनिल चौहान, सीडीओ विशाल मिश्रा, जगदीश सिंह आदी उपस्थित होते.