शिवसेनेची उस परिषदेमध्ये मागणी
कोल्हापूर दि. 26 : या वर्षीच्या गळीत हंगामामध्ये प्रति टन उसाची पहिली उचल एकरकमी 3600 रुपये द्यावी अंतिम दर 4000 रूपये द्यावा असा ठराव शिवसेनेने गडहिंग्लज येथे घेतलेल्या ऊस परिषदेमध्ये केला आहे.शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे म्हणाले, गतवर्षी ठरल्याप्रमाणे 200 रूपये दिलेच पाहिजेत. रंगराजन समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी. दौलत साखर कारखाना सुरू झाला पाहिजे. दौलतकडून थकीत बिले व कामगार देणी मिळाली पाहिजेत.
साखरेचा हमीभाव 3300 रूपये केला पाहिजे. यावेळी संग्रामसिंह कुपेकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.