ऊस सर्वेक्षण पन्नास टक्के पूर्ण: डीसीओ

मोदीनगर: आगामी गाळप हंगाम 2020-21 साठी सुरु असलेल्या ऊस सर्वेक्षणाचे काम पन्नास टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरीत कामही विभागाकडून लवकरच पूर्ण केले जाईल. 30 जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. हे लक्ष्य निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा ऊस अधिकार्‍यांनी सर्वेक्षण करणार्‍यांना कामात गती आणण्याचे निर्देश दिले आहेत. ऊस विभाग आणि साखर कारखान्याकडून ऊस सर्वेक्षणाचे काम सुरु आहे. ऊस पर्यवेंक्षक आणि कारखान्याचे कर्मचारी संयुक्तपणे गावात जावून तिथल्या ऊस पिकांचे सर्वेक्षण करत आहेत. दरम्यान, शेतकर्‍यांकडून घोषणापत्रही भरुन घेतले जात आहे, ज्यामुळे पुढे जावून शेतकर्‍यांना कोणतीही अडचण येणार नाही. या संदर्भात शेतकर्‍यांना सर्वेक्षण दरम्यान सर्व दस्तऐवज आपल्या सोबत ठेवण्याचे आवाहन केले जात आहे. जिल्हा ऊस अधिकारी ओम प्रकाश सिंह यांनी सांगितले की, जवळपास पन्नास टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरीत कामही लवकरच पूर्ण करण्यासाठी सर्व ऊस पर्यवेक्षकांना आदेश देण्यात आले आहेत. ते म्हणाले, कामात गती आणणे गरजेचे आहे. कोणत्याही परिस्थितीती 30 जूनपर्यंत सर्वे काम पूर्ण करायचे आहे. त्यांनी सांगितले की, शेतकर्‍यांनी सर्वेक्षना दरम्यान आधार कार्ड, बँक पासबुक यांच्या झेरॉक्स प्रती सोबत ठेवणे आवश्यक आहे. यामुळे सर्वेक्षणात कसलाही उशील होवू नये. सर्वेक्षण कार्यात शेतकर्‍यांचे सहकार्य अपेक्षीत आहे, तरच काम वेळेत पूर्ण केले जावू शकेल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here