लखनौमध्ये शेतकरी ऊस आयुक्तांना घालणार घेराव: थकीत बिले, विजेच्या मुद्यांवर आक्रमक भूमिका

लखनौ : उसाची थकीत बिले, वीजमाफी यांसह अनेक प्रलंबित मागण्यांबाबत राज्यातील हजारो शेतकरी लखनौमध्ये ऊस आयुक्तांना घेराव घालणार आहेत. भारतीय किसान युनियन हरिनाम सिंह गटाचे सभासद शेतकरी ऊस संस्थेसमोर आंदोलन करणार आहेत. यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे. याबाबत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हरिनाम सिंह म्हणाले की, उसाच्या दरात प्रती क्विंटल ५० रुपयांनी वाढ करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. शेतकऱ्यांना अद्याप थकीत ऊस बिले मिळालेली नाहीत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. याबाबत लवकरात लवकर सुधारणा न झाल्यास शेतकऱ्यांना आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही.

शेतकऱ्यांसाठी अद्याप वीज पूर्णपणे मोफत झालेली नाही. कुपनलिकांची जोडणी असलेल्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची चर्चा होती. मात्र राज्यात अनेक ठिकाणी ऊर्जा विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांना विज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांना त्रास देत आहेत. याबाबत भारतीय किसान युनियनने सांगितले की, शेतकरी लखनौ ऊस संशोधन संस्थेच्या (एससीआर) निर्णयाविरोधात आंदोलन करतील. संस्थेने घेतलेले निर्णय शेतकऱ्यासाठी चांगले नाहीत. याबाबत आधी शेतकरी संघटनांशी चर्चा व्हायला हवी होती. त्यानंतर निर्णय घेण्याची गरज आहे. याविरोधात बाराबंकी, लखनौ, रायबरेली, सीतापूर, उन्नच आणि हरदोई जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन करणार आहेत. याशिवाय महसूल, कृषी विभागाशी संबंधित शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here