घोडगंगा साखर कारखान्याच्या कामगारांचा शिरूर तहसीलवर मोर्चा

पुणे : दहा महिन्याचा थकीत पगार आणि इतर मागण्यांसाठी न्हावरे (ता. शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी आंदोलनाच्या अकराव्या दिवशी शिरूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. तेथे आंदोलकांनी सभा घेतली. यावेळी आंदोलकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. कामगारांचा १० महिन्यांचा थकीत पगार मिळाल्याशिवाय काम बंद आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा कामगार संघटनेचे नेते महादेव मचाले यांनी दिला. यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस महेश ढमढेरे, शिवसेना तालुकाप्रमुख गणेश जामदार, अनिल बांडे, अविनाश घोगरे, नाना मासाळ, शिवाजी शेंडगे, आदीसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here