उसाचा दुसरा हप्ता तत्काळ द्या, अन्यथा पुन्हा आंदोलन : आंदोलन अंकुशचा निवेदनाद्वारे इशारा

पुणे : मागील हंगामातील दुसरा शंभर रुपयांचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना देण्याचा प्रस्ताव मंजूर करून कारखान्यांना पाठवावेत. अन्यथा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना परत साखर आयुक्तालय आणि कारखान्याच्या विरोधात आंदोलन करावे लागेल, असा इशारा आंदोलन अंकुश या शेतकरी संघटनेने सोमवारी येथे साखर आयुक्त यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे दिला. यामुळे ऊस हंगाम समाप्तीकडे चालला असताना पुन्हा आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मागील आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पेठ वडगाव – हातकनंगले रोडवर काळे झेंडे दाखवले होते. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेपाठोपाठ आंदोलन अंकुशनेही आक्रमक भूमिका घेतल्याने याबाबत साखर आयुक्त कार्यालयाला लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे. मागील वर्षी गाळप केलेल्या उसाला दुसरा हप्ता मिळावा, यासाठी यंदाच्या गाळप हंगामाच्या प्रारंभी राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी जोरदार आंदोलन केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here