सिंगापूर : चीनी मंडी
जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव गुरुवारी पुन्हा घसरले. तेलाचा पुरवठा वाढल्यामुळे दराची घसरण सुरू झाली आहे. त्याचबरोबर अनेक अर्थव्यवस्था मंदावत असल्यामुळे तेलाचा खपही कमी होण्याची शक्यता आहे. त्याचा एकत्रितपरिणाम तेलाचे भाव गडगडण्यावर होताना दिसत आहे.
बाजारात ब्रेंट क्रूड ऑईलचा दर सध्या २४ सेंटसनी घसरून ६५.८८ डॉलर प्रति बॅरल (०.४ टक्के घसरण) असा आहे. तर, अमेरिकेच्या वेस्ट टेक्सास इंटरमिडिएटच्या कच्च्या तेलाचे दर, २९ सेंटसनी घसरून ५५.९६ डॉलर प्रति बॅरल (०.५ टक्क्यांचीघसरण) झाले आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून तेलाच्या दरांमध्ये घसरण सुरू झाली असून, आतापर्यंत जवळपास २५ टक्क्यांनी किंमत खाली आली आहे.
चीन हा जगातील सर्वांत मोठा तेल आयात करणार देश आहे. तर, कच्च्या तेलाचा दुसऱ्या क्रमांकाचा ग्राहक आहे. सातत्याने मागणी कमी होत असल्यामुळे आम्ही आशिया खंडातील मोठे ग्राहक आणि रिफायनरीजशी चर्चा केल्याचे एकाविश्लेषकाने सांगितले. तर, २०१८च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेमध्ये बदल झाले आहेत. चीनची अर्थव्यवस्था खालावली आहे. अजूनही अर्थव्यवस्थेचा हा आलेख खालावलेला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या आठवड्यातील आकडेवारीवर नजर टाकली, जपान आणि जर्मनीसारख्या बड्या औद्योगिक देशांच्या अर्थव्यवस्थेलाही तिसऱ्या तिमाहीमध्ये मंदीला सामोरे जावे लागले आहे. सध्याच्या घडीला अमेरिकेतील तेल उत्पादनात २२टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वर्षी रोज ११६ लाख बॅरल प्रमाणे अमेरिकेत तेल उत्पादन झाले आहे. त्यामुळे बाजारात तेल पुरवठा वाढला आहे. सध्याच्या घडीला पुरवठादार विकू शकतील यापेक्षाही जास्त बॅरल त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.
सध्याची तेलाची उपलब्धता पाहिली, तर २०१४मध्ये अतिरिक्त तेल पुरवठ्यामुळे तेलाची भाव मोठ्या प्रमाणावर घसरले होते. तशीच परिस्थिती पुन्हा ओढवले, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे तेल उत्पादक आणि निर्यातदार देशांनी(ओपीईसी) पुरवठा कमी करण्याविषयी चर्चेला सुरुवात केली आहे.