जागतिक तांदूळ पुरवठ्यात घट, एल निनोमुळे किमती आणखी वाढण्याची शक्यता

देशांतर्गत स्तरावर तांदळाच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. निर्यातीसाठी मागणी पुढेही मजबूत राहण्याची शक्यता असूनही मान्सूनच्या पावसावर ‘अल निनो’चा प्रभाव पडण्याच्या शक्यतेमुळे आणि खरीप हंगामातील उत्पादनाच्या वाढत्या चिंतेमुळे जागतिक स्तरावर तांदूळ पुरवठ्यात घट होण्याची शक्यता आहे.

बिझनेस स्टँडर्डमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, देशांतर्गत स्तरावर दर घटण्याची शक्यता नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे. कारण, जागतिक स्तरावर पुरवठ्याची स्थिती नाजूक बनली आहे. सध्या भारतीय तांदूळ सध्या जागतिक बाजारपेठेत सर्वाधिक स्पर्धात्मक आहे. त्यामुळे निर्यातीची मागणी आणखी मजबूत राहू शकते. याशिवाय मान्सूनवर ‘अल निनो’चा धोका निर्माण झाल्याने खरीप भाताचे उत्पादनही वाढले आहे. याबाबत Green Agrevolution Pvt. Ltd (DeHaat) चे कमोडिटी रिसर्च हेड इंद्रजीत पॉल यांच्या म्हणण्यानुसार, सध्या तांदळाचे ११२१ वाण ८३०० ते ८४०० रुपये प्रती क्विंटल दराने विक्री होत आहे. आणखी काही काळात हा दर ९००० ते ९५०० पर्यंत वाढू शकतो.

ग्राहक मंत्रालयाच्या प्राइस मॉनिटरिंग डिव्हिजनच्या आकडेवारीनुसार गेल्या एक वर्षात दिल्लीत तांदळाच्या किरकोळ किमतीत २२ टक्के वाढ झाली आहे. ५ मे २०२३ रोजी तांदळाचा दर ३९ रुपये किलो होता. एक वर्षापूर्वी हा दर ३२ रुपयांवर होता. घाऊक बाजारातील किमतीही समान कालावधीत १८ टक्क्यांनी वाढल्या आहेत. तांदळाचे दर २५५० रुपये प्रती क्विंटलवरून ३००० रुपये प्रती क्विंटलवर पोहोचला आहे. दुसरीकडे इंटरनॅशनल ग्रेन काउंसिलच्या वार्षिक अहवालानुसार, गेल्या एक वर्षात तांदळाच्या किमतीत १८ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये किमती ३ टक्क्यांनी वाढल्या. आगामी काळातही दरवाढ सुरूच राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here