लंडन: आंतरराष्ट्रीय साखर संघटनेने (आयएसओ) शुक्रवारी जागतिक साखर उत्पादन सुरुवातीलाच्या अपेक्षेपेक्षा कमी होईल असे अनुमान व्यक्त केले. आयएसओने आपल्या त्रैमासिक अहवालात सध्याच्या २०२०-२१ या हंगामात साखर उत्पादन जागतिक स्तरावर ३.१ मिलियन टनापेक्षा कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. फेब्रुवारी महिन्यातील ४.८ मिलियन टनाच्या अंदाजापेक्षा ते कमी आहे.
आयएसओला अपेक्षा आहे की, ऑक्टोबर २०२०- सप्टेंबर २०२१ या वर्षामध्ये साखरेचा खप १७२.४ मिलियन टन होईल. हा अंदाज यापूर्वीच्या १७३.८ मिलियन टनापेक्षा कमी असला तरी गेल्या हंगामाच्या तुलनेत १.२ टक्क्यांनी अधिक आहे. भारत आणि ब्राझीलमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत झालेली वाढ आणि प्रवासावर लागू झालेले निर्बंध यामुळे साखरेचा खप घटल्याचे आयएसओने म्हटले आहे.