न्यूयॉर्क : भारताने इथेनॉल उत्पादनासाठी ऊसाचा अधिक उपयोग करून घेण्यास सुरुवात केली आहे. आणि ब्राझीलमध्ये उसाच्या उत्पादनातील घसरणीमुळे ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या २०२१-२२ या हंगामात साखरेच्या जागतिक पुरवठ्याचे गणित बिघडण्याची शक्यता आहे, असे स्टोनएक्सने (StoneX) म्हटले आहे. सलग तिसऱ्या वर्षीच्या हंगामात साखरेच्या उत्पादनापेक्षा मागणी अधिक असल्याचे दिसून येण्याची शक्यता आहे. सर्वंकष स्थिती पाहता चालू हंगामात जागतिक बाजारपेठेत १.८ मिलियन टन साखरेच्या तुटवड्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यातील अंदाजापेक्षा ही आकडेवारी १ मिलियन टनाने अधिक आहे असेही स्टोनएक्सने म्हटले आहे.
यंदा साखरेचे जागतिक उत्पादन १८६.६ मिलियन टन होईल अशी शक्यता होती. तर मागणी १८८.४ मिलियन टन असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. स्टोनएक्सने सांगितले की, अलिकडेच आंतरराष्ट्रीय स्तरावर साखरेच्या मागणीत सुधारणा झाली आहे. आणि यामध्ये आशियाई देश तसेच रिफायनिंग हबकडून अधिक खरेदी होत असल्याचे दिसून आले आहे असे स्टोनएक्सने सांगितले. तर भारतात उच्चांकी ऊस उत्पादन दिसून येत आहे. मात्र, देशात इथेनॉल मिश्रण धोरणांतर्गत ३० लाख टन साखरेच्या उत्पादन क्षमतेच्या उसाचा वापर यासाठी केला जाईल. परिणामी साखर उत्पादन ३१ मिलियन टन होईल असे अनुमान वर्तविण्यात आले आहे.
दुसरीकडे ब्राझीलच्या मध्य आणि दक्षिण क्षेत्रात उत्पादन ३१.३ मिलियन टन होण्याची शक्यता आहे. एक वर्षाच्या तुलनेत यात १२ टक्क्यांची घट दिसून आली आहे. स्टोनएक्सने सांगितले की, ब्राझीलचा नवा साखर हंगाम एप्रिलमध्ये सुरू होईल. उसाच्या एकूण उत्पादनात ६ टक्क्यांच्या सुधारणांसह ५६५३ मिलियन टन उत्पादनाची शक्यता आहे. युरोपीय संघ, युकेमध्ये साखरेचे उत्पादन २०२१-२२ या हंगामात १२ टक्क्यांनी वाढून १७.२ मिलियन टन होण्याची शक्यता आहे.