न्यूयॉर्क : युक्रेन युद्ध आणि रशियातील कोरड्या हवामानामुळे जागतिक गव्हाच्या उत्पादनात पुढील हंगामात उच्चांकापेक्षा थोडी घट होण्याची शक्यता आहे, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेने शुक्रवारी म्हटले आहे की, २०२३-२४ या हंगामातील उत्पादन जवळपास १ टक्का घसरुन ७८४ मिलियन टन होईल अशी शक्यता आहे. गेल्या वर्षी गव्हाच्या किमती अस्थिर होत्या. त्याला रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाने अडथळे आले होते. आर्थिक अडचणी, पायाभूत सुविधांचे नुकसान आणि शेतांपर्यंत पोहोचण्यातील समस्या यामुळे युद्धाच्या शक्यतेनंतर युक्रेनचे शीतकालीन गहू क्षेत्र ४० टक्क्यांनी घसरले आहे. रशियामध्ये काही भागात कोरड्या हवामानामुळे आणि कमी किमतीमुळे पेरण्या कमी झाल्या आहेत. परिणामी पिकाचे उत्पादन उच्चांकी स्तरापासून घसरणार आहे.