गोवा: साखर कामगारांना सानुग्रह अनुदान देण्याचे कृषी मंत्र्यांचे आश्वासन

फोंडा : धारबांदोडा येथील संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या १९४ कामगारांना सानुग्रह अनुदान देण्यास मंजूरी देण्यात आली आहे अशी माहिती कृषी मंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी दिली. यामध्ये १०७ नियमित कर्मचाऱ्यांना २०२०-२१ मधील एक्स गार्शीया मिळेल. तर ८७ कर्मचाऱ्यांना गणेश चतुर्थीपूर्वी २०१९-२० आणि २०२०-२१ या दोन वर्षातील लाभ दिला जाणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने गुरुवारी सावर्डेचे आमदार आणि पीडब्ल्यूडी मंत्री दीपक पाऊसकर यांच्या मदतीने उपमुख्यमंत्री कवळेकर यांची भेट घेतली. मंत्री पाऊसकर यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, ते कामगारांना सर्व ते लाभ मिळावेत यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, कारखाना प्रशासन याच्या विरोधात आहे. कारखाना बंद पडला असताना कर्मचाऱ्यांना कोणत्या आधारावर अनुदान निधी द्यायचा असा प्रश्न प्रशासनाचा आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांनी आपला संप सोमवारपर्यंत स्थगित केला.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here