गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत कोरोनाग्रस्त आढळले आहेत. सावंत यांनी ट्वीटरवर ही माहिती दिली.
त्यांनी त्यामध्ये लिहिले आहे की, मी सर्वाना सूचित करु इच्छितो की, मी कोरोनाग्रस्त आढळून आलो आहे. मला संक्रमणाची कोणतीही लक्षणे नाहीत, यासाठी मी घरातच क्वारंटाइन राहणे पसंत केले आहे. मी घरातूनच माझे काम करेन. जे कुणी माझ्या संपर्कात आले असेल त्यांनी सावधानता बाळगा.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकड्यांनुसार, गोव्यामध्ये 3,962 सक्रिय कोविड-19 च्या केस आहेत आणि 13,850 लोक बरे झाले आहेत. आतापर्यंत राज्यात कोरोनावायरसमुळे 194 लोकांचा मृत्यु झाला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.