काणकोण : काणकोणमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
याबाबत, द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सुविधा समितीचे सदस्य प्रशांत देसाई यांनी म्हटले आहे की, आम्ही वर्ष २०१७-१८ मध्ये गोव्यात शेतकऱ्यांकडून उत्पादित करण्यात आलेल्या उसाची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. या ऊस उत्पादनाचा वापर कोठे करण्यात आला हे आम्ही जाणून घेऊ इच्छितो.
देसाई म्हणाले की, गोव्यातील ऊसाचे उत्पादन एका कारखान्यापर्यंत नेण्यासाठी परवानगी घेण्यात आली. मात्र, हा ऊस इतरत्र नेण्यात आला असा दावा देसाई यांनी केला आहे.