पणजी : गोव्यातील ऊस उत्पादक शेतकरी आपल्या उसाला कोणीही खरेदीदार मिळत नसल्याने हवालदिल झाले आहेत. हे शेतकरी खरेदीदारासाठी शेजारील राज्यांवर अवलंबून आहेत. या किनारपट्टीच्या राज्यातील एकमेव साखर कारखान्याचे कामकाज गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे.
याबाबत प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, गोवा ऊस उत्पादक संघटनेचे (ऊस उत्पादक संघ) अध्यक्ष राजेंद्र देसाई यांच्या म्हणण्यानुसार, ऊस तोडणीचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, शेजारील राज्यांमधून कोणीच खरेदीदार आलेले नाहीत. देसाई यांनी सांगितले की, आमच्या संघटनेचे जवळपास ८५० सभासद आहेत. राज्यातील एकमेव संजीवन साखर कारखाना बंज असल्याने अनेक शेतकऱ्यांनी उसाचे उत्पादन करणे बंद केले आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी ऊस पिक घेतले आहे, त्यांचे नुकसान होत आहे, कारण कोणीही खरेदीदार मिळत नाही.
ते म्हणाले की, असे काही एजंट्स आहेत की, जे ऊस खरेदी करण्यासाठी संपर्क साधतात, मात्र, तोडणीनंतर ते ठरवलेला दर देण्यात अपयशी ठरतात. ते म्हणाले की, अनेक एजंट तोंडी आश्वासन देतात. मात्र, एकदा ऊसाची तोडणी झाली की ते नंतर आपल्या शब्दावर ठाम राहात नाही.
‘संजीवनी सहकारी साखर कारखाना’ (गोव्याचा एकमेव साखर कारखाना) १९७२ मध्ये गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्याद्वारे दक्षिण गोव्यात धारबांदोडा येथे स्थपन करण्यात आला होता. सुरुवातीच्या टप्प्यात या कारखान्याचे ट्रॅक रेकॉर्ड उत्तम होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ऊस पिकाचे चांगले उत्पादन घेतले. मात्र, गेल्या एक दशकापासून साखर कारखाना तोट्यात गेला. आणि तीन वर्षांपूर्वी याचे कामकाज बंद करण्यात आले.