पोंडा, गोवा: गोवा सुरक्षा मंच चे अध्यक्ष नितिन फलदेसाइ, पोंडा प्रमुख हर्षद देवरी आणि शिरोडाचे प्रमुख संतोंष सावरकर यांनी सांगितले की, राज्य सरकार ऊस शेतकरी, ऊस वाहतुकदार यांचे प्रश्न सोडवत आहे. पण संजीवनी कारखान्यातील 110 कर्मचार्यांकडे कारखान्याकडून दुर्लक्ष होत आहे. त्यानीं दावा केला की, या सर्व कर्मचार्यांना पगार अत्यंत कमी मिळत आहे, आणि 2014-19 पासून त्यांचा बोनसही प्रलंबित आहे. कर्मचारी कमी पगारामुळे कर्जही भागवू शकत नाहीत तर रोजचा खर्चही भागवू शकत नाहीत.
त्यांनी सांगितले की, साखर कारखाना पुढच्या तीन वर्षांपर्यंत सुरु होण्याची शक्यता खूप कमी आहे आणि यासाठी सरकारने या कर्मचार्यांना विविध सरकारी विभागात नोकरी द्यावी, जेणेकरुन त्यांना चांगला पगार मिळू शकेल. काही कर्मचार्यांना यापूर्वी काही सरकारी विभागात नोकरी देण्यात आली आहे, पण सर्वांना घेण्याची आवश्यकता आहे. त्यांनी दावा केला की, संजीवनी कारखान्याच्या जमिनीवर राजकीय नेत्यांची नजर आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.