संजीवनी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्लांटमधून पुनर्विकासासाठी गोवा सरकारने स्वीकारला ‘Public Private Partnership’चा मार्ग

पणजी : राज्य सरकारने शुक्रवारी Public Private Partnership (PPP) तत्त्वावर तीन महत्त्वपूर्ण योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. या अंतर्गत धारबांदोडामधील संजीवनी साखर कारखान्यात इथेनॉल प्लांट, मडगावमध्ये वाणिज्यिक संपत्ती विकास योजना आणि विकास प्राधिकरण (पीडीए) आणि ब्रिटोनामध्ये समुद्री स्कूल पुनर्विकास योजनेचा समावेश करण्यात आला आहे.

PPP विभागाने इथेनॉल प्लांट स्थापन करण्यासाठी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनद्वारे (इंडिया) सादर करण्यात आलेल्या डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्टच्या (डीपीआर) आधारे साखर कारखान्याच्या पुनर्विकासासाठी एक आरएफक्यू (request for qualification) जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे PPP विभागाच्या संचालन समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. यामध्ये कृषी मंत्री रवी नाईक, २१ सदस्यांच्या ऊस उत्पादक शेतकरी सुविधा समितीचे प्रमुख नरेंद्र सावईकर, मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल आदींचा समावेश होता. साखर कारखान्याच्या पुनर्विकासासह वाणिज्यिक संपत्ती विकास आणि समुद्री स्कूलच्या पुनर्विकासाच्या प्रस्तावांसाठी RFP (request for proposal) मागविले जाणार आहेत. आगामी एका महिन्यात आरएफक्यू आणि आरएफपी मागविले जातील असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here