गोवा : ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संजीवनी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनाची मागणी

सांगे : सांगेतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारकडे लवकरात लवकर संजीवनी साखर कारखान्याचे पुनरुज्जीवन करण्याची मागमी केली आहे. ऑल गोवा फार्मर्स असोसिएशनचे सदस्य आणि शेतकरी नेते हर्षद प्रभुदेसाई यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने कारखान्याचे तातडीने नूतनीकरण करण्याची मागणी केली. साखर कारखाना बेमुदत काळासाठी बंद असल्याने या कालावधीसाठी शेतकऱ्यांना देण्यात आलेली नुकसान भरपाई लवकरच समाप्त होईल. प्रभुदेसाई म्हणाले की, जर शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन बंद केले तर पशुपालन व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर फटका बसू शकतो.

प्रभुदेसाई यांनी सांगितले की, ऊस शेतीमध्ये सहभागी शेतकरी डेअरी फार्मिंगमध्ये गुंतवणूक करतील. कारण त्यांना ऊस शेतीपासून जनावरांसाठी पुरेसा चारा मिळू शकेल. याबाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले की, सरकारने संजीवनी साखर कारखान्यात इथेनॉल प्लांट स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, इथेनॉल प्लांट स्थापन करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनाबाबत अनिश्चितीतची स्थिती पाहता, सांगेतील शेतकऱ्यांनी ऊसाऐवजी अन्य पिकांकडे वळणे पसंत केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here