पणजी : संजीवनी साखर कारखान्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या थकीत देण्यांबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी थकीत बिल त्वरीत देण्याची मागणी केली. कृषी संचालनालयाने आम्हाला याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे असे शेतकऱ्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचे सर्व मुद्दे सोडविण्याचे आश्वासन कृषी विभागाने दिले आहे. विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रलंबित पैसे लवकरच दिले जातील. प्रसार माध्यमांतील माहितीनुसार, शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी सरकारकडून निधी मंजुरी आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज आहे.