गोवा : दहा वर्षानंतर ऊस तोडणी हार्वेस्टर सुरू

फोंडा : धारबांदोडा तालुक्यातील दयानंद नगर येथील संजीवनी साखर कारखान्याने तोडणी मशीनची दुरुस्ती केली आहे. एक दशकाहून अधिक काळ ही मशीन बंद पडली होती. कारखान्याने २०१४ मध्ये या मशीनच्या लिलावाची प्रक्रियाही सुरू केली होती.

द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कारखान्याचे प्रशासक सतेज कामत यांनी सांगितले की, ऊस तोडणी मशीन चांगल्या स्थितीत आहे. किरकोळ सर्व्हिसिंग आणि बॅटरी बदलणे तसेच काही भागांचे ऑयलिंग केल्यानंतर मशीन सुरू झाले आहे.

कामत म्हणाले की, मशीनची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर मशीनने कारखान्याच्या शेतामध्ये जवळपास ३०० मेट्रिक टन ऊस शेतात कामही केले आहे. मशीन सुरळीत आहे. एसएम १५० टीबी ऊस तोडणी मशीन २०१० मध्ये कारखान्याने खरेदी केले होते. २०१४ मध्ये ८९ लाख रुपये दराने त्याचा लिलाव करण्यात येणार होता. मात्र, कोणी खरेदीदार मिळाला नव्हता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here