फोंडा : मे महिन्याच्या अखेरपर्यंत १६१ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे प्रलंबित अनुदान दिले जाईल, असे ऊस उत्पादक शेतकरी सुविधा समितीचे अध्यक्ष नरेंद्र सावईकर यांनी सांगितले. इथेनॉल योजना स्थापनेची प्रक्रिया जूनपर्यंत पूर्ण केली जाईल, असेही सावईकर यांनी सांगितले.
शुक्रवारी सावईकर यांच्या अध्यक्षतेखाली संजीवनी साखर कारखान्याच्या सभागृहात बैठक झाली. यावेळी ऊस उत्पादक शेतकरी संघाचे अध्यक्ष राजेंद्र देसाई, संजीवनी साखर कारखान्याचे प्रशासक सतेज कामत, कृषी संचालक नेविल अल्फोंसो, फ्रासिस मस्कारेन्हास आणि इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी घेतला.
सावईकर यांनी सांगितले की, राज्य सरकारने संजीवनी साखर कारखाना बंद पडल्यानंतर पाच वर्षांसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा केली होती. आणि ही रक्कम आधीच बँकेमध्ये जमा करण्यात आली आहे.