सोलापूर : पहिला हप्ता २८०० रुपये जाहीर केल्याने सध्या शेतकऱ्यांचा कल गोकुळ शुगरकडे वाढला आहे. दत्ता शिंदे दररोज हजारो टन ऊस वेटिंगमध्ये आहे. टोळ्यांची कमतरता भासत आहे. सतत शेतकरी फोन करत आहेत, परंतु शेतकऱ्यांनी काळजी करू नये. संपूर्ण ऊस गाळप केल्याशिवाय कारखाना बंद करणार नसल्याचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी स्पष्ट केले.
चेअरमन शिंदे म्हणाले की, गोकुळ शुगरने सध्या दीड लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा आकडा पार केला आहे. यापुढेही गोकुळ शुगर गोकुळ परिवाराच्या मदतीने उच्चांकी गाळप करणार आहे. सध्या ऊस मोठ्या प्रमाणात गोकुळ शुगरकडे उपलब्ध आहे, परंतु टोळ्यांची कमतरता भासत आहे. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन विशाल शिंदे, मॅनेजिंग डायरेक्टर कपिल शिंदे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर प्रदीप पवार, कार्तिक पाटील, अभिजीत गुंड, उमेश पवार, कारखाना अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.