बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे, आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच
नवी दिल्ली : चीनी मंडी
युरोपमधील साखर उद्योगाचा सुवर्णकाळ संपुष्टात आला असून, येत्या काळात युरोपच्या साखर उद्योग क्षेत्रात अमुलाग्र बदल दिसू लागतील, असे मत फ्रान्समधील क्रिस्टल युनियन या दुसऱ्या सर्वांत मोठ्या साखर उत्पादन कंपनीने व्यक्त केले आहे.
क्रिस्टल युनियनचे मुख्याधिकारी अलाइन कोमिस्सीएरी म्हणाले, ‘एका ठराविक टप्प्यापर्यंत साखरेच्या किंमती रिकव्हर होतील. पण, कोटा पद्धतीमध्ये आपण, ज्या पद्धतीने साखरेच्या किंमती अनुभवतो. त्या पातळीपर्यंत साखरेच्या किंमतींमध्ये सुधारणा होणार नाही.’ दुबईतील साखर परिषदेमध्ये त्यांनी हे मत व्यक्त केले आहे. २०१७मध्ये युरोपियन युनियनने साखर उत्पादन आणि साखरेचा कोटा मोडीत काढल्याने युरोपमधील साखर उद्योगात खळबळ उडाली होती. जागतिक बाजारात साखरेच्या अतिरिक्त साठा झाल्यानंतर किमती घसरल्या होत्या. त्यामुळे युरोपमधील साखर उत्पादकांनी मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यास सुरुवात केली होती.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp