बभनान : बलरामपूर साखर कारखान्याच्या बभनान युनिटने ऊस बिले देण्यात आघाडी घेतली आहे. आतापर्यंत अडीच अब्ज रुपयांची ऊस बिले शेतकऱ्यांना दिली आहेत.
साखर कारखान्याचे महाव्यवस्थापक पी. के. चतुर्वेदी यांनीी सांगितले की, १२ मार्चअखेर आलेल्या सर्व उसाचे पैसे देण्यात आले आहेत. या वर्षी आतापर्यंत एकूण २ अब्ज ६३ कोटी ७१ लाख ३२ हजार रुपये शेतकऱ्यांच्या विविध बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत. साखर कारखान्याला आगामी वर्षात एक कोटी ५० लाख क्विंटल उसाची गरज भासणार असल्याचे चतुर्वेदी यांनी सांगितले. उसाची लागवड योग्य पद्धतीने सुरू असल्याचे ते म्हणाले.