गोंडा : बजाज हिन्दुस्थान शुगर लिमिटेड च्या कुन्दरखी साखर कारखाना परिसरात 11000/700 वोल्ट च्या कन्वर्टर डी. सी. ट्रान्सफार्मर मध्ये २८ जानेवारीच्या संध्याकाळी अचानक आग लागली. दरम्यान, साखर कारखान्यात ऊस गाळपाचे काम केले जात होते. ही माहिती देताना बजाज साखर कारखान्याचे यूनिट हेड जी.वी. सिंह व कारखाना संचालक आर. सी. पाण्डेय यांनी सांगितले की, कारखाना नं. २ च्या कन्वर्टर डी. सी. ट्रान्सफार्मर मध्ये अचानक शॉटसर्किटमुळे आग लागली. ज्याची सूचना कारखाना व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांकडून गोंडा एवं मनकापूरच्या फायर स्टेशनसह मोती गंज ठाण्यात देण्यात आली. तिथेच कारखाना कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी त्वरीत कारवाई करून कारखान्यात उपलब्ध अग्निशमन यंत्राचा वापर करुन आगीवर लवकर ताबा मिळवला . आग विझवल्यानंतर अग्निशमन व मोती गंज ठाण्याच्या पोलीसांनी घटनास्थळी पोचून घटनेची पाहणी केली. कोणतीही जिवित हानी झाली नाही. पण कन्वर्टर डी. सी. ट्रान्सफर्मर खराब झाला. ज्याचे आकलन इन्जिनियरिंग विभागाकडून घेण्यात येत आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.