प्रवासी मजुरांनी सुरु केली ऊसाची शेती आणि मजुरी

गोंडा : कोरोना काळात घरात परतलेल्या परदेशींनी ऊसाच्या शेतीमध्येच गोडवा शोधला. ऊसाची लागवडच नाही तर मजुरीच्या रुपात पैसे कमावले, इतकेच नाही तर स्वत: ऊस शेतकरी बनले आहेत. सोशर मीडियाच्या माध्यमातून ऊसाच्या शेतीचे प्रकार शिकले आणि नकदी पीकाच्या रुपात ऊसाची लागवड केली. काही शेतकर्‍यांनी तर ऊसाबरोबरच अन्य पीकाची शेती करुन अतिरिक्त पैसे कमावले.

बसंतकालीन लागवडीच्या रुपात जिल्ह्यात 35 हजार हेक्टर ऊसाची लागवड 80 हजार शेतकर्‍यांनी केली आहे. ज्यामध्ये दहा हजार प्रवासी शेतकरी सामिल आहेत. ज्यांनी पहिल्यांदाच ऊस पिकवला आहे. प्रवासींच्या मेहनतीमुळे यावेळी जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्रफळ जवळपास पाच हजार हेक्टरपर्यंत वाढले आहे. ऊस समितीचा सदस्य बनण्यासाठी तीन हजार शेतकर्‍यांनी विभागामध्ये अर्जही दिले आहेत.

तरबगंज येथील रंजीत कुमार दिल्लीतून नोकरी सोडून एप्रिलमध्ये आले होते. घरी आल्यानंतर त्यांनी रोजगाराच्या संधी शोधल्या, पण यश आले नाही.यानंतर त्यांनी ऊस शेतीचे काम करुन 250 रुपये प्रतिदिन कमावले. त्यांनी विचार केला की, बाहेर जाण्याची संधी आता एका वर्षानंतर येईल. अशामध्ये शेती का करु नये. रंजीत यांच्या मतानुसार, त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून ऊस विभागाच्या अधिक़ार्‍यांशी संपर्क साधला. जिल्हा ऊस अधिकारी ओम प्रकाश सिंह यांच्या नावाने बनलेल्या यूट्युब चॅनेलशी जोडले केल्यानंतर ऊसाच्या शेतीबाबत सर्व माहिती त्यांनी मिळाली. यावेळी त्यांनी एक एकर ऊस लागवड केला आहे. बेलसर च्या राजेश यांनीही नकदी पीकाच्या रुपात यावेळी ऊसाची लागवड केली आहे.

जिल्हा ऊस अधिकारी ओपी सिंह म्हणाले, कोरोनाचा फैलाव वाढल्यामुळे मोठ्या संख्येने प्रवासी आपल्या घरी परतले होते. जिल्ह्यामध्ये जवळपास दहा हजार प्रवाशांनी यावेळी ऊस लागवड केली आहे. फेसबुक, ट्वीटर, यू ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून ऊसाच्या शेतीबाबत माहिती देण्यात आली. ही मोहिम चांगली झाली. याचा परिणाम असा झाला की, जवळपास पाच हजार हेक्टर ऊसाचे क्षेत्रफळ यंदा वाढले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here