साखर कारखान्यांकडून ऑक्सिजन प्लांटसाठी चांगले सहकार्य : आरोग्य मंत्री टोपे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख, शरद पवार यांनी साखर कारखान्यांना आपल्या यंत्रणेत बदल करून ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याच्या केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
टोपे म्हणाले, महाराष्ट्र ऑक्सिजन उत्पादनात आत्मनिर्भर बनला पाहिजे अशी अपेक्षा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आहे. राज्य सरकारने स्थानिक स्तरावर ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी मिशन ऑक्सिजन मोहीम सुरू केली आहे. साखर कारखान्यांची प्रतीदिन ५०० एमटी ऑक्सिजन उत्पादनाची क्षमता आहे. काही कारखान्यांनी आधीच उत्पादन सुरू केले आहे.

राज्य सरकारने कोरोनाच्या पॉझिटिव्हिटी दरात आणि मृत्यू दरात घट आणण्यासाठी चाचण्या वाढविण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर आणि सातारा येथे पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांवर आहे.

टोपे म्हणाले, सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. जिल्हा प्रशासनाला कोरोना रोखण्यासाठी उपाय लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारने सात जूनपासून पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड उपलब्धता याच्या टक्केवारीवर आधारीत पाच टप्प्यात अनलॉक मोहीम सुरू केली आहे. राज्य सरकारने केंद्राकडे अधिक लसींची मागणी केली असल्याचे टोपे यांनी सांगितले.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here