पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा १९ वा हप्ता जानेवारी किंवा फेब्रुवारी २०२५ मध्ये येणे अपेक्षित आहे. विविध प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्य हाती पैसे पडू शकतात. मात्र, अधिकृत तारखेची पुष्टी अद्याप झालेली नाही. गेल्या वर्षी, २०२४ मध्ये १६ ते १८ असे तीन हप्ते जाहीर झाले. यापैकी एक हप्ता ऑक्टोबर महिन्यात जारी करण्यात आला. त्याआधी फेब्रुवारीत सोळावा हप्ता देण्यात आला. त्यानुसार, नवा हप्ता फेब्रुवारी २०२५ मध्ये असू शकतो.
हिंदूस्थानमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पीएम किसान ही योजना देशातील छोट्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करते. पात्र जमीनधारक शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ मिळतो. तीन समान हप्त्यात हे पैसे दिले जातात. लाभार्थ्यांना काही टप्पे पूर्ण करावे लागणार आहेत. यामध्ये ई-केवायसी पडताळणी, जमीन पडताळणी आणि बँक खात्याशी आधार लिंक करणे आणि ई-केव्हीएस अर्ज अपडेट करणे याचा समावेश आहे.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.